संतोष देशमुखांचे ते फोटो पाहून युवकाची आत्महत्या

0
13

दि . 5 ( पीसीबी ) – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं नोव्हेंबर २०२४ मध्ये आधी अपहरण आणि नंतर त्यांची निर्घुण, अमानुषरित्या हत्या करण्यात आली. या घटनेनंतर केवळ बीडमध्येच नाही, तर संपूर्ण राज्यात संताप केला जात आहे. त्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास ८० हून अधिक दिवस उलटून गेल्यानंतर ३ मार्च रोजी त्यांची हत्या करताचे आरोपींचे फोटो, संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारहाण केल्याचे फोटो समोर आले. हे फोटो पाहून प्रत्येकजण हळहळला. संतोष भैय्या देशमुख यांना इतक्या क्रूरपणे मारहाण केल्यानंतरचे फोटो फोटो पाहून एका तरुणाला मोठा धक्का बसला. याच धक्क्यातून त्याने टोकाचं पाऊल उचललं. बीडच्या केज तालुक्यातील जानेगाव येथे अशोक हरिभाऊ शिंदे, या २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.