लाडकी बहिणीला २१०० रुपये मिळणार ?

0
12

मुंबई, दि. ५ : विधान परिषदेत आज लाडक्या बहीण योजनेच्या मुद्द्यावरुन चर्चा सुरु असताना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली. विशेष म्हणजे विरोधकांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून देणार? असा प्रश्न विचारला तेव्हा आदिती तटकरे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या अधिवेशन काळात किंवा अर्थसंकल्पात आपण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना दर महिन्याला 2100 रुपयांची मदत घोषित करु, असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही”, असं मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या.

यावेळी विरोधकांनी महायुतीच्या जाहीरनाम्यात 2100 रुपयांचं आश्वासन दिलं होतं, अशी आठवण करुन दिली. त्यावरही आदिती तटकरे यांनी भाष्य केलं. “जाहीरनामा हा पाच वर्षांसाठी असतो. या अर्थसंकल्पात 2100 करणार असं वक्तव्य कुठेही केलेलं नाही. पाच वर्षांसाठी जाहीरनामा केला जातो. मंत्रिमंडळ ज्यावेळेला सूचित करेल त्यावेळी तशा पद्धतीचा प्रस्ताव आम्ही शासनासमोर ठेवू”, अशी प्रतिक्रिया आदिती तटकरे यांनी दिली.