अनाधिकृत बांधकाम कारवाई विरोधात काँग्रेस कायदेशीर लढाई लढणार : डॉ. कैलास कदम

0
3

दि . ४ ( पीसीबी ) – पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व प्रभारी बी. एम. संदीप यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या भ्रष्ट व मनमानी कारभाराविरोधात महापालिकेच्या गेट समोर धरणे आंदोलन घेण्यात आले.
यावेळी आरोग्य ,पाणीपुरवठा, पर्यावरण स्थापत्य, वाहतूक विभाग शिक्षण विभागामधील अनेक समस्यावर आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी बी एम संदीप यांनी राज्य सरकार तसेच पालिका प्रशासन दिल्ली ते गल्ली भाजप सरकार कसे भ्रष्टाचारात अखंड बुडाले आहेत याची माहिती दिली.
तसेच शहराध्यक्ष कैलास कदम यांनी महापालिकेच्या मनमारी कारभाराचा पाढाच वाचला. कशाप्रकारे प्रशासनामधील अधिकारी व सत्ताधारी आमदार संगणमताने करदात्यांच्या पैशाची अक्षरशः लूट करत आहेत हे निदर्शनास आणून देणे काँग्रेस पक्षाचे कर्तव्य आहे, तसेच वैयक्तिक आकासापोटी कुदळवाडी चिखली येथे कारवाई केली व सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावर आणून त्याठिकाणी काहीजणांचा भूखंडावर डोळा आहे हे स्पष्ट होते, तसेच काळेवाडी मधील अनेकांना अनधिकृत बांधकामा बद्दल नोटीस प्राप्त झालेल्या आहेत, त्यासाठी हे नागरिक पूर्णपणे भयभीत झाले असून सध्या तणावांमध्ये आहेत परंतु काँग्रेस पक्ष यापुढे अशा कारवाईविरोधात कायदेशीर लढाई लढणार आहे, असे आश्वासन कैलास कदम यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना दिले. राज्य सरकार व मनपा प्रशासन विरोधात घोषणा देऊन महापालिका परिसर दणाणून सोडला.
याप्रसंगी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या शामला सोनावणे, अशोक मोरे, भाऊसाहेब मुगुटमल, किशोर कळसकर, पर्यावरण विभाग महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अमरसिंग नाणेकर, सामाजिक न्याय विभाग प्रदेश उपाध्यक्ष वाहब शेख, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, सेवादल अध्यक्ष प्रा. ॲड. किरण खाजेकर, ओबीसी सेल अध्यक्ष सोमनाथ शेळके, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष हिरामण खवळे, प्रॉफेशनल कॉंग्रेस विभागाचे अध्यक्ष दाहर मुजावर, पर्यावरण विभाग अध्यक्ष अक्षय शहरकर, इंटक अध्यक्ष तुषार पाटील, व्यापारी सेल अध्यक्ष अमरजितसिंग पाथीवाल, उपाध्यक्ष अबूबकर लांडगे, बाबासाहेब बनसोडे, केनिथ रेमी, मुन्साफ खान, मकरध्वज यादव, विशाल कसबे, अर्चना राऊत, ज्योती गायकवाड, बबित ससाणे, सुवर्णा कदम, सुनीता जाधव, सुनीता मिसाळ, मिलिंद फडतरे, वसंत वावरे,सतिश भोसले, आण्णा कसबे, कुंदन कसबे, गौतम ओव्हाळ, सचिन गायकवाड, रवि कांबळे, योगेश बहिरट, साजिद खान, भिमराव जाधव, फोरोज तांबोळी, दीपक भंडारी, राहुल शिंपले, भास्कर नारखडे, गुंगा क्षीरसागर, अशोक कदम, चंद्रकांत हौन्शाळ, बळीराम गायकवाड, रेवजी घाडगे, विशाल शेलार, अमित मोरे, शांताराम कदम, अहजत शेख, प्रथमेश विटकर, गणेश बंदपट्टे, गणेश शेलार, आदी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.