इंद्रायणी घाट स्वच्छता मोहीम; शेकडो स्वयंसेवकांचे श्रमदान

0
5

दि . ४ ( पीसीबी ) – जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमन सोहोळ्याला येत्या वर्षी 375 वर्षे पूर्ण होत आहेत. कार्यक्रमाच्या तयारीचा भाग म्हणुन श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्री क्षेत्र देहू ह्यांच्या मार्गदर्शनात देहू नगरपंचायत व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, देहू गट ह्यांच्या संयुक्त विद्यमाने इंद्रायणी घाट स्वच्छता मोहिमेचे आयोजन रविवारी देहू येथे करण्यात आले होते. दर वर्षी तुकाराम महाराज बीज सोहोळ्याचे औचित्य साधून 15 लाखाहून अधिक भाविक देहूला येत असतात. त्यांच्या स्वागतासाठी देहू नगरी सज्ज होते आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये व उत्सवाचे पावित्र्य टिकून राहावे यासाठी ह्या स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १५ शाखांमधून १०५ स्वयंसेवक तसेच इतरही नागरिक स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.
भल्या पहाटे स्वच्छता मोहिमेला सुरुवात करून स्वयंसेवकांनी घाट परिसर स्वच्छ करून नगर पंचायतीच्या मदतीने कचरा संकलित केला. देहू नगर पंचायत नगराध्यक्षा पूजा दिवटे, देहू नगरपंचायत चे मुख्य अधिकारी निवेदिता घार्गे, , आस्थापन विभाग अधिकारी महेश वाळके व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देहू गट संघचालक नरेशजी गुप्ता यांच्या मार्गदर्शनात गट सेवा विभाग प्रमुख तसेच सेवा विभागाच्या नियोजनात यशस्वी झाला. उत्सवाच्या दरम्यान येणार्‍या भाविकांनी सुद्धा स्वच्छता टिकवण्यात सहकार्य करावे अशी विनंती आयोजकांमार्फत करण्यात आली.