मराठीसह संत साहित्य अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून जगभरात पोहोचवणार ; उदयजी सामंत

0
7

माऊली मंदिरात ओळख श्री ज्ञानेश्वरीची पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात
उद्योग व मराठी भाषा मंत्री उदयजी सामंत यांचे हस्ते प्रकाशन
संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण जन्मोत्सवी वर्ष उपक्रम
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्री संत ज्ञानेश्वर माऊली, श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत नामदेवराय, संत बहिणाबाई आदी संतांचे साहित्य हे मराठी भाषेचे वैभव असून मराठी भाषा अभिजात भाषा आहे. या पुढील काळात जगभर जाण्यासाठी मराठीसह संत साहित्य ई बुक, डिजिटल स्वरूपात विकसित करण्याचा संकल्प असून येत्या पाच वर्षात संत तुकाराम महाराज यांची गाथा ही ई बुक मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उद्योग व मराठी भाषा मंत्री उदयजी सामंत यांनी केले.
संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण जन्मोत्सवी वर्षानिमित्त श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी व ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवार यांच्या वतीने शालेय मुलांच्या मूल्य संवर्धनासाठी ओळख श्री ज्ञानेश्वरीची व परिचय भागवत धर्माचा ओळख ज्ञानेश्वरीची या दोन पुस्तकांचे प्रकाशन उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदयजी सामंत यांचे हस्ते माऊली मंदिरात वारकरी संप्रदाया तील मान्यवरांचे साक्षीने धार्मिक मंगलमय वातावरणात झाला. ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवाराचे वतीने श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरात पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या प्रसंगी व्यासपीठावर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, माजी प्रमुख विश्वस्त व विश्वस्त ऍड राजेंद्र उमाप, पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे,डॉ. नारायण महाराज जाधव, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, संस्थानचे माजी विश्वस्त पुस्तकाचे लेखक, डॉ. अभय टिळक, लेखक सुभाष महाराज गेठे, वासुदेव महाराज शेवाळे, भागवत महाराज साळुंखे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, अशोक उमरगेकर, सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई कुऱ्हाडे पाटील, मालन घुंडरे पाटील, सुवर्णाताई काळे, संजय महाराज घुंडरे पाटील, निलेश लोंढे महाराज भाजपचे केंद्रीय समिती सदस्य डॉ. रामशेठ गावडे, शहराध्यक्ष राहुल चव्हाण, कामगारनेते बाबा कांबळे, ओळख श्री ज्ञानेश्वरीची परिवारातील सर्व घटक, अध्यापक, संस्था चालक, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, बाळासाहेब महाराज शेवाळे, वारकरी संप्रदायातील थोर कीर्तनकार, प्रवचनकार, भाविक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचे हरिनाम गजरात माऊली मंदिरात औक्षण करीत स्वागत करण्यात आले. श्रींचे गाभाऱ्यात श्रींची पूजा, आरती, पसायदान झाल्यानंतर आळंदी देवस्थान तर्फे त्यांचा सर्व विश्वस्त यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. त्या नंतर ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवाराचे वतीने आयोजित पुस्तक प्रकाशन समारंभास श्रींचे ग्रंथ, श्रींची मूर्ती पूजन आणि दिपप्रज्ज्वलन करीत प्रकाशन सोहळ्यास सुरुवात झाली.
यावेळी प्रास्ताविकात प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब यांनी ओळख श्री ज्ञानेश्वरी या उपक्रमाची माहिती सांगत संवाद साधला. उपक्रमाचे महत्त्व लक्षात घेत देवस्थानाने या उपक्रमास पाठबळ दिले असून संत साहित्य सर्वदूर जाण्याचे दृष्टीने या उपक्रमास राजाश्रय मिळावा. प्रकाशित होत असलेली दोन पुस्तके नसून ही वाभावी ग्रंथ संपदा असल्याचे सांगत ते म्हणाले, शालेय मुलांचे अभ्यासक्रमात समाविष्ठ व्हावीत. अशी भूमिका मांडत संत साहित्य आणि मराठीचा गौरव अधिकाधिक व्हावा यासाठी ए आय सारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान यासाठी वापरले जावे असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी आरंभ- प्रारंभ आणि आमंत्रणे- निमंत्रणे यावर भाष्य करीत सुसंवाद साधला.
यावेळी डॉ. अभय टिळक सुभाष महाराज गेठे, डॉ. भावार्थ महाराज देखणे यांनी मनोगते व्यक्त केली.
ओळख श्री ज्ञानेश्वरीची हा शालेय मुलांसाठी मूल्य संवर्धनाचा, संस्कारक्षम मुले घडावीत यासाठी सुरु असलेला उपक्रम ७५ शाळांत सुरु असून हा उपक्रम सर्वदूर पोहोचावा. यासाठी सर्व शाळांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आळंदी संस्थानचे विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांनी केले.
या प्रकाशन सोहळ्यांत ओळख श्री ज्ञानेश्वरी या पुस्तकाचे लेखक ह.भ.प. सुभाष म. गेठे, ह.भ.प. वासुदेव म.शेवाळे, ह.भ.प. भागवत म. साळुंके, डॉ. अभय टिळक, उमेश महाराज बागडें यांचा सत्कार उद्योग मंत्री सामंत यांचे हस्ते करण्यात आला.
उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, संत ज्ञानेश्वर महाराजांची भाषा हि जगातील सर्व भाषांना मागे टाकणारी भाषा आहे. संतांचे साहित्य हे मराठी भाषेचे वैभव आहे. सर्व संत साहित्य ई-बुक, संत तुकाराम महाराज गाथेतील अभंग देखील डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. येत्या पाच वर्षांत संत तुकाराम महाराज गाथा ही ई-बुक मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी सर्व वारकरी संप्रदायातील जाणकार मान्यवरांनी यासाठी अहंकारी करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी या कार्यासाठी वारकरी संप्रदायातील सर्वानी मदत करावी यासाठी शासन सर्वोतोपरी मदत करेल असे त्यांनी सांगितले. वारीत वारकरी कशाचीही तमा न बाळगता श्री विठ्ठल चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात. त्यांची निष्ठा आपण सर्वानी आत्मसात केली पाहिजे. मराठी भाषेचाप्रचार, प्रसार सर्व जगभर पोहोचविण्यास शासन कमी पडणार नाही. सर्व ते सहकार्य केरेलशी ग्वाही देत ते म्हणाले, येत्या काळात जगातील १०० देशांत मराठी भाषा मंडळांचे माध्यमातून मराठी भाषेचा गजर करायचा आहे. यासाठी अनेक उपक्रम असून यात श्रीक्षेत्र आळंदीत दरवर्षी दोन दिवशीय कीर्तन महोत्सव आयोजनाचा संकल्प त्यांनी जाहीर केला. येथील कीर्तन महोत्सवाची जगात दखल घेतली जाईल असा भव्य दिव्य कीर्तन महोत्सव घेतला जाईल. या ठिकाणी प्रकाशन सोहळ्यास येण्याचे भाग्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. असे भाग्य सर्वाना लाभत नसल्याचे ही त्यांनी सांगितले. राज्य शासनाचे माध्यमातून तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. मराठी भाषा प्रचार, प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम तसेच शालेय शिक्षण आणि संत साहित्यातून मुलांना संस्कारक्षम शिक्षण देण्यासाठी शिक्षण मंत्री यांचे समवेत लवकरच बैठक घेतली जाईल असे त्यांनी सांगितले.
या प्रकाशन सोहळ्यात उद्योग मंत्री सामंत यांचा विविध संस्था, पदाधिकारी यांनी सत्कार केला. यात श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ऍड विष्णू तापकीर, हराळे वैष्णव समाज धर्मशाळा आणि संत रोहिदास महाराज दिंडी क्रमांक २४, संत रोहिदास महाराज मठ आळंदी यांचे तर्फे देखील उद्योग मंत्री उदयजी सामंत यांचा सत्कार विना, संत तुकाराम महाराज यांची पगडी, तुळशी हार घालून कामगारनेते अध्यक्ष बाबासाहेब कांबळे, विश्वस्त तुषार नेटके, तुषार वायकुळे, शिवनाथ गायकवाड यांचेसह समाज बांधव यांनी केला. आळंदी ग्रामस्थांचे वतीने निलेश महाराज लोंढे कबीरबुवा यांचे मठात सत्कार व सद्दिच्छा भेट देण्यात आली. येथे ही सत्कार करण्यात आला. श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती, ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवार यांचे वतीने देखील सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे यशस्वीतेस संस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, उमेश बागडें, श्रीधर सरनाईक, अर्जुन मेदनकर, विश्वम्भर पाटील, प्राजक्ता हरफळे, सोपान काळे, धनाजी काळे, तात्या गवारी, बापू गोरे, धनाजी काळे, कैलास आव्हाळे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन नरहरी महाराज चौधरी यांनी केले. श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती अध्यक्ष प्रकाश काळे यांनी आभार मानले.