तरुणाचे शेअर्स मार्केटमध्ये १५ लाख रूपयांची रक्कम बुडाली म्हणून त्याने स्वतःला पेटवले

0
17

दि . २ ( पीसीबी ) – शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाल्यामुळे तरुणाने आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिकच्या सातपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. १५ लाख रूपये बुडाल्याने आर्थिक विवंचनेत येऊन तरुणाने अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतलं. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेचा तपास नाशिक पोलिस करत आहे.

शेअर मार्केटमध्ये १५ लाख रूपये बुडाल्याने आर्थिक विवंचनेत येऊन तरुणाने पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवून घेतलं. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला. नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणाने शेअर मार्केटमध्ये जास्त पैसे कमवू या उद्देशाने गुंतवणूक केली. पण शेअर मार्केटमध्ये त्याला मोठा फटका बसला. या तरुणाचे शेअर्स मार्केटमध्ये १५ लाख रूपयांची रक्कम बुडाली. त्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या या तरुणाने टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवलं.

रवींद्र शिवाजी कोल्हे असे मृत तरुणाचे नाव असून तो मुळचा चांदवड तालुक्यातील विटाई येथे राहणारा आहे. तो सध्या नाशिकच्या खुटवडनगर परिसरात राहत होता. या तरुणाने शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक केली होती. तो प्रारंभी मॅक्स लाईफ इन्शुरन्स आणि सध्या आरबीएल बँकेत कामाला होता. त्याने त्याला मिळत असलेले पैसे आई वडीलांना न देता शेअर्स मार्केटमध्ये गुंतवले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केट कोसळत असल्याने त्यात त्याचे सुमारे १५ लाख रूपयांचे नुकसान झाले होते.

शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाल्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडला होता. मात्र ऐवढी मोठी रक्कम कशी फेडणार? आई – वडीलांनाही आपण फसवले असल्याची भावना त्याच्या मनात निर्माण झाल्याने त्याने पिंपळगांव बहुला येथील ज्योती विद्यालयाच्या मोकळ्या मैदानावर दुचाकीवर बसून स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले. या घटनेत तरुण ९० टक्के भाजला. त्याला जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा तपास नाशिक पोलिस करत आहे.