पुणे, दि. २८ : राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काल स्वारगेट बसस्थानकाला भेट दिली, पोलिसांकडून घटनेची माहिती घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना योगेश कदम म्हणाले, तरूणीने आरडाओरडा केला नाही, म्हणून बलात्कार झाला, असं वक्तव्य केल्याने राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यावरती विरोधकांनी हल्लाबोल केला, त्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले, योगेश कदम जे बोलण्याचा प्रयत्न करत होते ते चुकीच्या पद्धतीनं पोट्रे झालं आहे. ते नवीन आहेत काही करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मी म्हणेल सेन्सेटिन्ह बोललं पाहिजे. लोकप्रतिनिधी यांनी सेन्सेटिव्ह बोललं पाहिजे असा माझा सल्ला असेल, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम काय म्हणाले?
गृहराज्यमंत्री कदम यांनी गुरुवारी येथे माध्यमांशी बोलताना पोलिसांना पाठिंबा दिला आहे. या घटनेला डेपो मॅनेजर जबाबदार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. तर “विकृत विचाराचा एक पुरुष तिथे महिलेशी काहीतरी गोड बोलतो. काहीतरी दीड-दोन, चार मिनिटांमध्ये ब्रेन वॉशिंग करतो. त्यानंतर घडलेल्या घटनेची आपल्याला माहिती आहे. परंतु, अशावेळी तिथे कोणतीही हाणामारी, तिथे कोणतंही आर्युमेंट, कुठलंही फोर्स, असं काही घडलेलं नाही. जे काही घडलंय ते अतिशय शांतपणे झालेलं आहे. तिथे आरडाओरडा सुरू आहे, हाणामारी झालेली आहे, असं काहीच घडलेलं नाही. ज्यावेळी आरोपी ताब्यात येईल, तेव्हाच आपल्याला माहिती मिळेल”, असं तिने म्हटलं आहे.
विजय वडेट्टीवारांचा योगेश कदमांवर हल्लाबोल
योगेश कदम व संजय सावकारे यांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावा, सरकारने दोघांनाही पाठीमागे घालू नये, दोघांवर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. योगेश कदम मुलीला खोटे ठरवत आहे का? पीडितला मुलीला आरोपी ठरवत असल्याने नाराजी व्यक्त केली. ही भूमिका योगेश कदम यांची आहे की, सरकारची हे सरकारने स्पष्ट करण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
तर यांना रस्त्यावर ठोकलं पाहिजे – संजय राऊत
संजय राऊत यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, एका महिलेवर मुलीवर होणाऱ्या जर अशा पद्धतीच्या घटना यांना सामान्य वाटत असतील, तर यांना रस्त्यावर ठोकलं पाहिजेल. काल राज्याचे गृहराज्य मंत्री महणाले, बलात्कार हा शांतपणे सुरू होता. त्या मुलीने स्ट्रगल केलं नाही, तिने शांतपणे होवू दिलं सगळं मग आम्हाला कसं कळणार. महिलांवरील अत्याचार संदर्भात मंत्री किती असंवेदनशील आहेत, मग बलात्काराला राजमान्यता द्या, कॅबिनेटमध्ये असा ठराव मंजूर करावा. विरोधी पक्षाने आवाज उठवला म्हणून तर पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरून आरोपाचा शोध घेतला. संजय सावकारे हे मंत्रीच आहेत. अशा घटना होत असतात अस म्हणतात. आमच्या आर.आर.पाटील यांनी बडे शहर मे छोडी घटना होती है, असं म्हटल्यावर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. संजय सावकारे आणि योगेश कदम यांचा राजीनामा घेतला पाहिजे. इतके असंवेदनशील लोक जर तुमच्या मंत्रिमंडळात असतील तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घ्यायला हवा असं राऊत यांनी म्हटलं आहे