शीख दंगल प्रकरणात 41 वर्षांनंतर न्याय, दोषी ठरलेल्या काँग्रेस नेत्याला जन्मठेप

0
3

दि. २५ ( पीसीबी ) – 1984 मध्ये उसळलेल्या शीख विरोधी दंगलीतील सहभागासाठी काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने शीख विरोधी दंगल आणि सज्जन कुमार यांचा सहभागन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 41 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात दोषी ठरलेल्या सज्जन कुमार यांच्याविरोधात न्यायालयाने कठोर निर्णय घेतला आहे.
1 नोव्हेंबर 1984 रोजी सरस्वती विहार येथे जमावाने शीख समुदायावर हल्ला केला होता. या हिंसाचारात जसवंत सिंह आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंह यांना जिवंत जाळण्यात आले होते. जमावाने त्यांच्या घरात घुसून हत्या केली आणि नंतर लूटमार करत संपूर्ण घर जाळून टाकले.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने नमूद केले की, सज्जन कुमार हे केवळ जमावाचा भाग नव्हते, तर त्यांनी हिंसक जमावाचे नेतृत्व केले होते. हे प्रकरण एका विशिष्ट समाजावर झालेल्या सामूहिक नरसंहाराशी संबंधित असल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयात सांगितले. त्यामुळे सज्जन कुमार यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
1984 शीख विरोधी दंगलप्रकरणी सुरुवातीला पंजाबी बाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. नंतर विशेष तपास पथकाने (SIT) या प्रकरणाचा तपास हाती घेतला.
16 डिसेंबर 2021 रोजी न्यायालयाने सज्जन कुमार यांच्यावर आरोप निश्चित केले. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी जमावाने मोठ्या प्रमाणात शीख समुदायावर हल्ला केला. या हिंसाचारात अनेक लोक मारले गेले, मालमत्तेची नासधूस झाली आणि शीख कुटुंबांवर भीषण अत्याचार करण्यात आले.