ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती प्राध्यापिका कमल अरुण पाटील यांचे निधन

0
5

नवी सांगवी,दि.२५ – ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती प्राध्यापिका कमल अरुण पाटील यांचे सोमवार, दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी दुःखद निधन झाले. त्यांनी जळगाव आकाशवाणी केंद्रावर विद्यार्थ्यांसाठी आणि ग्रामीण महिलांसाठी स्वतः लिखाण करून ५००हून अधिक कार्यक्रम सादर केले होते. बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनावर व कवितांवर आधारित ‘खानदेशाची लोकधारा’ या कार्यक्रमाचे संहितालेखन त्यांनी केले होते. सुमारे पन्नास कलाकारांसह बहिणाबाईंची मुख्य भूमिका स्वतः सादर करून त्यांनी हा कार्यक्रम अजरामर केला.
‘खानदेशची लोकधारा’ बरोबरच ‘मी श्यामची आई बोलते’ हा एकपात्री प्रयोग तसेच व्याख्यान, कथाकथन, काव्यवाचन आणि स्फुटलेखन अभिवाचन यांचे त्यांनी महाराष्ट्रभर प्रयोग केले होते. तीस वर्षे त्यांनी कार्यक्रमांमधून निवेदन केले. लेवा गणबोलीतील त्यांचे निवेदन म्हणजे समृद्ध महाराष्ट्राला मिळालेली सांस्कृतिक मेजवानीच होती. आग्रा येथील बॅरिस्टर सरदार पटेल राष्ट्रीय एकात्मता साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. प्रशांत, सून मनीषा आणि दोन नाती असा परिवार आहे.