माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांनी हॅप्पीनेस स्ट्रीट उपक्रमातील शेवटच्या रविवारी राबिवलेल्या ‘WALKATHON’ ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
4

पिंपरी दि. 24 ( पीसीबी ) :- मा.उपमहापौर डब्बू आसवानी यांनी पिंपरी येथे ‘हॅप्पीनेस स्ट्रीट’ हा उपक्रम राबविला आहे. सदर उपक्रम २९ डिसेंबर २०२४ ते २३ फेब्रुवारी २०२५ पर्यंत दर रविवारी पिंपरी येथील ओपन लॉन येथे राबविले गेला. ‘फिट राहा, आनंदी राहा व संपर्कात राहा, असा संदेश देत हा उपक्रम संपण करण्यात आला.
या उपक्रमा बाबत डब्बू आसवानी यांच्याशी अधिक माहिती घेतली असता, ते म्हणाले, लहान मुलांसह वयस्कर व्यक्तींनी आनंदी राहावे, विविध खेळाचा आनंद घ्यावा, याकरिता या हॅप्पीनेस स्ट्रीट उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमात लहान मुलांसाठी व युवक-युवतींसाठी तसेच वयोवृद्ध व्यक्तीसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.

मनुष्याचे जीवन निरोगी राहण्यासाठी, आयुष्यात खेळांचा समावेश असणे आवश्यक असते, लहान-मोठे वृद्ध सर्वांच्याच जीवनात विविध खेळाचे अनन्य साधारण महत्व असते, आणि यामुळेच पिंपरी चिंचवड शहरातील माजी उपमहापौर हिरानंद उर्फ डब्बू आसवानी यांनी पिंपरी मध्ये ‘हॅप्पीनेस स्ट्रीट’ नावाचे उपक्रम राबवित आहेत. या उपक्रमाच्या अंतर्गत ४० विविध खेळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

या उपक्रमात सर्व वयोगटातील नागरिकांचा सहभाग पाहावयास मिळत आहे. योगा, जुंबा, लाईव्ह म्युझिक, डान्स, ड्रम, लाईव्ह शो, तसेच विविध खेळांच्या स्पर्धा यामध्ये केरेम, बुद्धिबळ, रनिंग, सायकलिंग, जॅमर्स बोवलिंग असे अनेकोनेक उपक्रम या हॅप्पीनेस स्ट्रीट अंतर्गत राबविले.

तसेच दि.२३ फेबुवारी २०२५ रोजी या उपक्रमाचा शेवटचा रविवार होता त्या अनुषंगाने डब्बू आसवानी यांनी पिंपरीनगर मध्ये ३ किमी चे ‘WALKATHON’ चे आयोजन केले होते. ‘WALKATHON’ साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन ठेवले गेले होते तसेच रजिस्ट्रेशन साठी ९९ रुपये फी आकारण्यात आली होती. सदर ‘WALKATHON’ साठी एकूण १४७० नागरिकांचे रजिस्ट्रेशन झाले होते. रजिस्ट्रेशन केलेल्या सर्व नागरिकांना जर्सी तसेच ‘WALKATHON’ पूर्ण झाल्या नंतर मेडल देण्यात आले. पिंपरी चिंचवड शहर डीसीपी मा.भास्कर ढेरे साहेब, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष योगेश बहल, परमानंद जमतानी, मा.नगरसेवक हरेश आसवानी यांच्या उपस्थितीत ‘WALKATHON’ ची सुरवात झाली. ‘WALKATHON’ साठी जमा जालेले डोनेशन रक्कम हि जे.एमडी ग्रुप, सोफोश चाइल्ड आश्रम, अपंग आश्रम पुणे या तिन्ही संस्थाना प्रति ५० हजार रुपायचे चेक देण्यात आले.

सदर उपक्रम राबवत असतानी अविनाश इसरानी, पवन भोजवानी, सुरज धरयानानी, मनीष गिरजा, माझे सहकारी, मित्र परिवार तसेच प्रिशा स्कूल मेंबर, जीन मधु जुमानी, शोभा फिटनेस क्लास, गीतुज फिटनेस क्लब, लेट लूज जुंबा पलक अहुजा, टीम डान्ससेशन बाय हितेश आणि कशिश, जीन हरीश गुले, नित्या फिटनेस, विनोद डान्स अकादमी लिशा फिटनेस, किरण योगा ग्रुप, डान्स हूड बाय मेहक, जे,एमडी ग्रुप व इतर सर्व यांच्या सहकार्याने सदर उपक्रम खूप उत्सहात पार पडला त्या बद्दल त्यांचे सर्वांचे त्यांनी आभार मानले.
तसेच ‘हॅप्पीनेस स्ट्रीट’ साठी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसदासाठी सर्व नागरिकांचे मनपूर्वक धन्यवाद मानले.