- पुणे जिल्हाध्यक्ष पदी गणेश हूंबे यांची निवड
- सचिव पदी मंगेश सोनटक्के तर उपाध्यक्ष पदी गणेश मोरे यांची निवड
पिंपरी, दि. 21 – डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्षपदी प्रशांत साळुंखे तर सचिव पदी मंगेश सोनटक्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर पुणे जिल्हाध्यक्ष पदी गणेश हुंबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीची आज (शुक्रवारी) बैठक खेळीमेळीत पार पडली.
यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा नियुक्ती प्रदान सोहळा संपन्न झाला.
यावेळी संघटनेचे प्रदेश सचिव महेश कुंगावकर, सरपंच परिषदेचे अध्यक्ष बापूसाहेब जगदाळे, राज्य समन्वयक अमोल पाटील, राज्य सहसचिव केतन महामुनी, माजी पुणे जिल्हाध्यक्ष अजिंक्य स्वामी, माजी शहराध्यक्ष विकास शिंदे यांच्यासह पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार राजा माने यांचा सत्कार पञकार विकास शिंदे यांच्या हस्ते शाल, गुलाबपुष्प व पुस्तक भेट देऊन करण्यात आला. तर संघटनेच्या प्रदेश पदाधिका-यांचे देखील स्वागत करण्यात आले.
यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या
शहर कार्यकारणीत उपाध्यक्षपदी गणेश मोरे, सुवर्णा गवारे, सचिवपदी मंगेश सोनटक्के, कार्याध्यक्ष पदी अविनाश कांबीकर, खजिनदार संजय गायखे, प्रसिद्धीप्रमुख लीना माने तर सदस्यपदी विकास शिंदे, संजय शिंदे, रवी जगधने, पूनम पाटील, यशोदा नाईकवाडे, सोमनाथ नाडे, स्वयम असवार, निलेश सायकर, सूचित कुलट, हनुमंत तरडे, मनोज जाधव, रवी वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांना शुभेच्छा देत संघटना वाढीसाठी आणि संघटनेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरातील डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांसाठी काम करण्याचे व त्यांच्या समस्या मार्गी लावण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच शासनस्तरावर डिजिटल मीडिया पत्रकारांना विविध सोयी सुविधा देण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.