दहावीचा मराठीचा पेपर फुटला

0
14

दि २१ ( पीसीबी ) – एकीकडे राज्य सरकारकडून कॉपीमुक्त अभियान जोरदारपणे सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, तरीही 12 वीच्या परीक्षा सुरू असतानाअनेक परीक्षा केंद्रावर कॉपी केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यातच, आजपासून दहावी (SSC exam) बोर्ड परीक्षा सुरू झाल्या असून पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर (Exam) फुटल्याचे वृत्त आहे. जालन्यातील एका परीक्षा केंद्रावर दहावीचा मराठीचा पेपर फुटला असून पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच उत्तर पत्रिकेच्या झेरॉक्स समोर आल्या आहेत. जालन्यातील बदनापूर येथील प्रकार असून या घटनेनं शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकीकडे शिक्षणमंत्री परीक्षा केंद्रावर भेट देऊन कॉपीमुक्त अभियानाची पाहणी करत आहेत. मात्र, दुसरीकडे मराठवाड्यात पेपर फुटीने खळबळ उडाली असून परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमेतवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सकाळी 11 वाजता मराठीचा पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच बदनापूर शहरातील सीएसी केंद्रांवर पेपर फुटल्याचे समोर आले.