भावपूर्ण श्रद्धांजली!

0
17

ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे स्वीय सहाय्यक तुकाराम धुवाळी यांच्या दुःखद निधनाची बातमी ऐकून अत्यंत वेदना झाल्या. त्यांच्या जाण्यानं एका प्रामाणिक व संयमी सहकाऱ्याला आपण गमावलं आहे.

पवार साहेबांच्या सार्वजनिक जीवनात १९७२ पासून सतत त्यांच्या सोबत राहून, अतिशय सचोटीनं व जबाबदारीनं आपली भूमिका पार पाडणाऱ्या धुवाळी यांनी अखेरच्या श्वासापर्यंत निःस्वार्थ सेवा केली. विनम्र, हसतमुख, प्रत्येकाशी स्नेहानं वागणारा आणि कामात अत्यंत शिस्तबद्ध असा हा सहकारी कायम आठवणीत राहील.

त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो.