पिंपरी , दि. ४ – एका वृद्ध महिलेला शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडत महिलेची २४ लाख ८१ हजार ५४७ रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना २४ जून ते १९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडली.
याप्रकरणी संत तुकाराम नगर येथील ६० वर्षीय महिलेने संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रणिता जोशी नावाच्या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने फिर्यादी यांना एका ग्रुप मध्ये जॉईन करून घेतले. तिथे फिर्यादी यांना शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. विश्वास संपादन करून २४ लाख ८१ हजार ५४७ रुपये भरण्यास सांगत त्यांची फसवणूक करण्यात आली.