मोठ्या शिताफिने बिबट्या जेरबंदप्राधिकरणातील कुत्र्यांची शिकार करण्यासाठी आला असावा…

0
4

पिंपरी चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरणासारख्या उच्चभ्रू वसाहतीमध्ये कबीर उद्यानात आज सकाळी बिबट्याचे दर्शन झाले. वन विभाग आणि रेस्क्यू टीमच्या माध्यमातून दोन तासाच्या आत बिबट्याला मोठ्या शिताफिने बेशुध्द करून पकडण्यात आले. बिबट्याला पकडून बावधन येथील बिबट्या संवर्धन केंद्रामध्ये नेण्यात आले आहे.

लोकमान्य रुग्णालयाच्या पाठीमागील भागामध्ये उद्यानात फिरायला गेलेल्या नागरिकांना सकाळी साडेसहा वाजता बिबट्याचे दर्शन झाले. बंगल्याच्या गच्चीवरून एका नागरिकाने त्याचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले. पाषाण येथील रेस्क्यू टीम आणि वनविभागाचे अधिकारी प्राधिकरणामध्ये दाखल झाले आणि त्यांनी भूलीचे इंजेक्शन देऊन दोन तासात बिबट्याला पक़ले.
सुरवातीला या पथकाने सर्बं जागेची पाहणी केली. तोपर्यंत या ठिकाणी महापालिकेचे अग्निशमन विभाग आणि पोलीस यंत्रणा दाखल झाली होती. त्यांनी कबीर उद्यान नाच्या परिसरातील रस्ते बंद केले. नियंत्रण आणले. रेस्क्यू टीमच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला बिबट्या कोठे आहे याची पाहणी केली त्यानंतर तो प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षक यांच्या घरात असल्याचे दिसले त्यानंतर रेस्क्यू टीमच्या एकाने डॉट च्या माध्यमातून इंजेक्शन दिले आणि काही मिनिटातच साडेअकराच्या सुमारास बिबट्याला पकडण्यात यश आले. बिबट्याला पकडून रेस्क्यू टीमने बावधन येथील बिबट्या संवर्धन केंद्रामध्ये नेण्यात आले आहे. यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती.

भरगच्च वसाहतीत बिबट्या आलाच कसा ?

भर वसाहतीत बिबट्या आलाच कसा असा प्रश्न सर्वांना पडला आहे. दुर्गादेवी उद्यान परिसरातून तो शिकार शोधत शोधत वसाहतीत आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पहाटे पाच ते आठ च्या दरम्यान याच उद्यानात शेकडो लोक मॉर्निंग वॉकला येतात. कोणालाच कसा दिसला नाही हासुध्दा प्रश्न आहे. राकेश सोनिगरा यांच्या तसेच आणखी तीन बंगल्यांच्या आवारात हाच बिबट्या ये-जा करत होता. रात्री या परिसरात १०-१५ कुत्री फिरत होती ती दिसेनाशी झाल्याने बिबट्या कुत्र्यांची शिकार करण्यासाठी आला होता, अशी शक्यता आहे. भर रस्त्याने तो चालत गेला असेही एका नागरिकांने सांगितले. एका बंगल्यातून उडी मारली आणि तो उद्यानात दडून बसला होता.
दोन बिबटे असल्याचे काही नागरिक सांगतात मात्र, तसा कोणताही पुरावा मिळालेला नाही.