महंत नामदेव शास्‍त्री यांची भूमिका निषेधार्ह : सतिश काळे

0
4

मराठा क्रांती मोर्चा,संभाजी ब्रिगेडच्‍या वतीने संताप.

बीड , दि.. १ बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्‍या हत्‍येनंतर राजकीय सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे मंत्री धनंजय मुंडे यांच्‍या काही समर्थकांना या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे मंत्री मुंडे यांच्‍या मंत्रीपदाच्‍या राजीनाम्‍याची मागणी सर्वच जाती-धर्मातील सर्वसामान्‍य नागरिक करत आहेत मात्र दुसरीकडे त्‍यांना पाठिंबा दर्शवून महंत नामदेव शास्‍त्रींनी घेतलेली भूमिका निषेधार्ह आहे. अनेकांच्‍या त्‍यामुळे भावना दुखावल्‍या आहेत तर संतोष देशमुख यांनी चापट मारल्‍याने पुढील गोष्टी घडल्‍याचे महंतांनी केलेले वक्‍तव्‍य संतापजनक आहे त्‍यांच्‍या वक्‍तव्‍याचा आणि भूमिकेचा निषेध आहे अशा भावना पिंपरी-चिंचवड मराठा क्रांती मोर्चाचे समन्‍वयक तसेच संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष अध्यक्ष सतीश काळे यांनी व्‍यक्‍त केल्‍या आहेत काळे यांनी दिलेल्‍या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की शहिद सरपंच संतोष आण्णा देशमुख यांनी संबंधीत आरोपींना चापट मारली त्‍यामुळे पुढील घटना घडल्‍याचे वक्‍तव्‍य महंत नामदेव शास्‍त्री यांनी केले आहे तसे वृत्‍त देखील विविध माध्यमांतून प्रसिद्ध झाले त्‍यांच्‍या या वक्‍तव्‍याचा अनेकांनी निषेध केला आहे केवळ चापट मारली म्‍हणून एवढ्या विकृतपणे हत्‍या करणे योग्य आहे का याचे उत्‍तर आधी महंत नामदेव शास्‍त्री यांनी द्यावे तसेच ज्‍या मंत्री धनंजय मुंडे यांच्‍यावर संपूर्ण बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात नाराजीचा सूर ओढत आहे त्‍यांच्‍या राजीनाम्याची मागणी करत आहे त्‍यांना जाहिररीत्या पाठिंबा देऊन चुकीचे काम करणाऱ्यांना महंत नामदेव शास्‍त्रींचे समर्थन आहे का हे स्‍पष्ट करावे सरपंच संतोष आण्णा देशमुख यांची ज्‍या विकृत पद्धतीने हत्‍या झाली त्‍यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि देश देखील हळहळ व्‍यक्‍त करत आहे जात-पात आणि धर्म न पाहता माणुसकीसाठी सर्वच एकजुटीने आरोपींना फाशी झाली पाहिजे या मागणीसाठी लढत आहेत रस्‍त्‍यावर उतरुन आंदोलन करत आहेत वंजारी समाजबांधव देखील मराठा समाजाच्‍या खांद्याला खांदा लावून लढा देत आहे मात्र महंत नामदेव शास्‍त्री यांची भूमिका ही जातीला धरुन आहे की काय असा संशय येतो ज्‍या भगवान गडाला सर्वच जाती-धर्मातील भक्‍त वंदन करतात त्‍याच गडाचे महंत चुकीचे काम करणाऱ्या स्‍वजातीय व्‍यक्‍तीला पाठिंबा देत असल्‍याचे दिसते हे काम त्‍यांना शोभणारे नाही
त्‍यामुळे सरपंच हत्‍या प्रकरणाचा संपुर्ण तपास होत नाही तो पर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांना पाठिंबा देऊ नये तसेच महंत नामदेव शास्‍त्री यांनी केलेल्‍या वक्‍तव्‍यामुळे सर्वांच्‍या भावना दुखावल्‍या आहेत त्‍याबाबत त्यांनी माफी मागून शब्द माघारी घ्यावेत अशी मागणी काळे यांनी केली आहे.