: इच्छाशक्ती प्रबळ असल्यास आपोआप मार्ग सापडतो
: इंदिरा समुहाच्या चाणक्य स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे उद्घाटन
परंदवाडी, दि.२३ : जगात प्रत्येकाला दुःख-अडचणी, ताण-तणाव आहेत. सगळेच मनासारखे होत नाही. त्यामुळे संकटांना सामोरे जा, संघर्ष करा, कष्टाला पर्याय नाही. इच्छाशक्ती प्रबळ असल्यास आपोआप मार्ग दिसतो. जो ध्येय ठरवून प्रामाणिक कष्ट करतो, संघर्ष करतो निश्चितपणे येणारे दिवस हे त्याचेच असतात. असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांनी परंदवाडी (मावळ) येथे केले.
इंदिरा शिक्षण समुहाच्या परंदवाडी कॅम्पस मधील चाणक्य स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे उदघाट्न क्रीडामंत्री भरणे यांच्या हस्ते गुरुवारी (ता. २३) संपन्न झाले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी श्री चाणक्य एज्यूकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सरिता वाकलकर, अध्यक्षा आणि मुख्य मार्गदर्शिका डॉ. तरिता शंकर, अर्जुन पुरस्कार विजेते सचिन खिलारी, शिक्षण समूह सल्लागार प्रा. चेतन वाकलकर, व्ही.एम. म्हस्के, अशोक विखेपाटील, शिवाजी काळे, आदित्य काळे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे भरणे म्हणाले, स्वतः आनंदी राहून इतरांना जेवढा आनंद द्याल त्याच्या कैक पटीने आनंदाची पुन:रप्राप्ती तुम्हाला होईल.
प्रास्ताविकपर भाषणात डॉ. तरिता शंकर
म्हणाल्या, कुठलाही सपोर्ट नसताना इंदिराने अनेक चढ-उतार पाहत, अत्यंत खडतर प्रवासातून ह्या वास्तूचा कायापालट केला. आपण कायम सर्वतोपरी कष्ट करावे शरीर आणि मनाचा संगम साधून बाकीचे देवावर सोडावे. तरुणांचा विचार पुढे नेणारे भरणे यांच्या सारखे मंत्री देशालाही मिळावेत. प्रा. चेतन वाकलकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मंत्री भरणे यांचा पुणेरी पगडी, सन्मान चिन्ह, शॉल देऊन सन्मान झाला. गुणवंत खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी २१ लाख रुपयांच्या सरिता शंकर वाकलकर स्कॉलरशिप स्कीमच्या लोगोचे आणावरनही यावेळी झाले. पल्लवी पवार, पूर्णा शंकर यांनी सूत्रसंचालन केले. निलेश उके यांनी आभार मानले.
इंदिराने सचिन सारखा खेळाडू देशाला दिला
इंदिरातील आधुनिक सुख सुविधा पाहून मला समाधान वाटले. इंदिराने सचिन खिलारे सारखा प्रतिभावान ऑलंपियन देशाला दिला. त्याचा मला अभिमान आहे असे गौरोदगार मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काढत इथून पुढेही असंख्य गुणी खेळाडू इंदिराने घडवावेत त्यासाठी सर्वतोपरी मदत मी करेल. अशी ग्वाही त्यांनी दिली. इंदिरा स्कुलच्या विद्यार्थ्यांनी गायलेले ओ यारो हो तैय्यार या समूह गीताचे तसेच विविध खेळांच्या प्रत्यक्षिकांचेही कौतुकही त्यांनी
केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध खेळात ठसा उमटविलेले इंदिराचे माजी विद्यार्थी इब्राहिम रझा खान, सचिन खिलारी, गरिमा खुशवाह यांचा विशेष सन्मान झाला.