बातमीला सनसनाटी स्वरुप देणे माध्यमांनी टाळा – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
3

मुंबई, दि. २१

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंत्रालयातील समिती सभागृहात झाले. एखाद्या घटनेची वस्तुनिष्ठता तपासूनच माध्यमांनी बातमी द्यावी. बातमीला सनसनाटी स्वरुप देणे माध्यमांनी टाळावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी केले.

यावेळी विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, माहिती व जनसंपर्कचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, मंत्रालय आणि विधिमंडळ संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, उपाध्यक्ष महेश पवार, सरचिटणीस प्रवीण पुरो, खजिनदार विनोद यादव आदी उपस्थित होते.

पुरस्कार्थींची नावे :

कै. कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार-
जेष्ठ पत्रकार श्री. पंढरीनाथ सावंत (सन २०२३) आणि श्रीमती ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी (सन २०२४)

राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सन २०२३ :
मुद्रित माध्यम – लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार संदिप आचार्य, लोकसत्ता
वृत्तवाहिनी –पत्रकार विनया देशपांडे, सीएनएन आयबीएन
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार वार्ताहर संघ सदस्य –ज्येष्ठ पत्रकार दीपक भातुसे, लोकमत, मुंबई

राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सन २०२४ :
मुद्रित माध्यम –ज्येष्ठ पत्रकार प्रगती पाटील, लोकमत सातारा
वृत्त वाहिनी – मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
वार्ताहर संघाच्या संदस्यांमधून दिला जाणार पुरस्कार : राजन शेलार, पुढारी, मुंबई