पिंपरी मध्ये तरुणावर चाकूने वार

0
13

पिंपरी, दि. २१ (पीसीबी)
पिंपरी मधील रिव्हर रोडवर तिघांनी मिळून एका तरुणावर चाकूहल्ला केला. यामध्ये तरुण जखमी झाला आहे. ही घटना १९ जानेवारी रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली.

विशाल उर्फ सॅम्युअल डेडेली अर्नाल्ड, भूपेंद्र उर्फ सनी चरणजितसिंग गिल (दोघे रा. पिंपरी) आणि दोन अनोळखी तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिव्हर रोडवर फेरफटका मारत होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तुला मारून टाकतो असे म्हणत विशाल याने फिर्यादीवर चाकू हल्ला केला. फिर्यादी यांनी चाकूचा वार चुकवला. मात्र त्यांच्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.