कार चालकाला अडवून मारहाण

0
10
crime

बावधन, दि. २१ (पीसीबी)
कार चालकाला अडवून एकाने मारहाण केली. ही घटना १८ जानेवारी साडेतीन मुंबई-सातारा महामार्गावर बावधन येथे घडली.

प्रकाश मारुती जमदाडे (वय ४८, रा. वाकड) यांनी याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार (एमएच ०१/ईजे ४२३९) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या कारमधून बारामती येथे जात होते. बावधन येथे आल्यानंतर आरोपीने त्यांची कार जमदाडे यांच्या कारला आडवी लावली. त्यानंतर जमदाडे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यामध्ये जमदाडे जखमी झाले आहेत. बावधन पोलीस तपास करीत आहेत.