कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक, दोघांना अटक

0
14

दिघी, दि. २१ (पीसीबी)
कत्तल करण्यासाठी जनावरांची वाहतूक करणाऱ्या दोघांना दिघी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. १९) सायंकाळी चऱ्होली येथे करण्यात आली.

मोहम्मद सय्यद (वय ३०, रा. धुळे), सईद अहमद मुबिनुरेहमान अन्सारी (वय ४१, रा. धुळे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. रोहित अशोक नाईकरे (वय २७, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी एका पीकप टेम्पो मध्ये चार जनावरे बांधून त्यांची कत्तलीसाठी वाहतूक केली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत चार जनावरांची सुटका केली. टेम्पो ताब्यात घेतला असून आरोपींना अटक केली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.