पिंपरी, दि. २१ (पीसीबी) शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना आगामी महापालिका स्वबळावर लढणार, अशी घोषणा खासदार संजय राऊतांनी केली आहे. पिंपरी-चिंचवडच्या शिवसैनिकांची मात्र वेगळी भूमिका आहे. राज्यात स्वबळावर लढले तरी पिंपरीत मात्र महाविकासआघाडी कायम ठेवा, असा आग्रह संपर्क प्रमुख सचिन अहिरांकडे पिंपरीच्या शिवसैनिकांनी केली आहे. महायुती स्वबळावर लढली आणि महाविकास आघाडी एकत्र लढली तर ताकद वाढेल. त्यामुळं पुणे, पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी दिसू शकते. ही शक्यता नाकारता येत नाही. असे संकेत देताना सर्वस्वी निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील असं ही अहिरांनी नमूद केलं आहे.
सचिन अहिर म्हणाले, दोन मतप्रवाह आहेत, महाविकास आघाडीकडून लढावं तर महाविकास आघाडीचे नेते पुढे सोबत राहतील का नाही, माहिती नाही, असा संभ्रम निर्माण झालेला आहे, म्हणून पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये एका बैठकीचे आम्ही नियोजन केलेलं आहे. आमचं जरी वेगळं मत असले तरीदेखील अंतिम निर्णय हा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंचा असेल. 23 तारखेला आपली भूमिका जी राज्यव्यापी असेल ती जाहीर करतील, असेही पुढे त्यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना सचिन अहिर म्हणाले, याबाबत एक गोष्ट नक्की आहे. या आधी देखील जेव्हा जेव्हा आघाडी धर्म म्हणून जिल्हास्तरीय आपण निर्णय घ्यायचो, त्या-त्या ताकतीने त्या-त्या प्रवाहाने आपण काम करायचो, पुणे पिंपरी चिंचवड यांच्यासह काही भागांमध्ये आघाडी केली तर आपली आणखी ताकद वाढू शकते. समोर आघाडी होणार नसेल तर त्याचा फायदा मोठ्या प्रमाणावर आपल्याला मिळू शकतो. शक्यता नाकारता येणार नाही पण, एक गोष्ट नक्की आहे. पक्ष म्हणून जेव्हा भूमिका घेत असतात. एका बाजूला तुम्ही आघाडी करता आणि दुसऱ्या बाजूला विरोध करता असा संभ्रम देखील लोकांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो. त्यामुळे काही शहरांना लागून आहेत त्यामध्ये ठाणे कल्याण ठिकाणी पक्ष स्वबळावरती लढण्याचा निर्णय घेऊ शकतो. पुणे, पिंपरी, चिंचवड या ठिकाणी स्वबळावर लढायचं की आघाडी करायची याबाबत संयुक्त निर्णय आपल्याला या दोन्ही महानगरपालिकेच्या बाबतीत घ्यावा लागेल. उद्या आम्ही पिंपरी चिंचवडला वेगळी भूमिका घेतली आणि पुण्याला आम्ही एकत्रित राहण्याचा निर्णय घेतला तर तिकडे विसंगती येईल, कारण तिकडे दोन्ही शहरांना लागून आहेत, या सर्व गोष्टींची चर्चा निश्चितपणे केले जाईल असेही पुढे ते म्हणालेत.
पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर ती बोलताना सचिन अहिर म्हणाले, जे लोक काही नसताना पक्षाकडे विश्वासाने येतात. त्यांना पक्ष मोठ्या विश्वासाने जबाबदारी देतो. काही महिन्यातच त्यांना उमेदवारी देखील जाहीर होते आणि त्यांनी पक्ष सोडल्यानंतर नेत्यांवरती गंभीर आरोप करायचे हे दुर्दैवी आहे. मला असं वाटतं यांना जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. जय-पराजय हा वेगळा भाग असतो. नेत्यांवर आरोप करण्यात काहीच अर्थ नाही, गेल्या काही काळात ते मला भेटले होते. मात्र त्यांनी याबाबत माझ्याशी कोणती चर्चा केली नाही अर्थात त्यांना जाण्यासाठी रस्ता मोकळा आहे आणि मार्ग आहेत, त्यांनी ते स्वीकारावे मात्र त्यांनी नेत्यांवर आरोप करून ठपका ठेवून आरोप करण्याचं काम केलं असेल तर ते दुर्दैवी आहे. पक्षालाही विचार करावा लागेल अशा नेत्यांना अशा कार्यकर्त्यांना जेव्हा आपण पक्षात घेत होतो, तेव्हा नेते जबाबदारी देतो आणि अशा प्रकारे वागणाऱ्यांना कशी जबाबदारी द्यावी असा प्रश्न निर्माण होतो असेही ते पुढे म्हणालेत.