बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांची निवड झाल्याबद्दल मंत्री पंकजा मुंडे यांनी श्री अजित पवारांचे अभिनंदन केले.

0
8

मुंबई दि. २१ (पीसीबी) – उपमुख्यमंत्री सन्माननीय ना.अजित दादा पवार यांची बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल मंत्री पंकजा मुंडे यांनी आज मंत्रालयात भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले

बीड जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात अजितदादा आपल्याकडून आम्हाला भरपूर आशा अन् अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी माझे व माझ्या संपूर्ण टीम कडून सर्वस्वी सहकार्य असेल. असा विश्वास पंकजा मुंडे यांनी श्री अजित पवार यांना दिला.