दि.20(पीसीबी) – विधानसभा मतदारसंघातून पराभुत झालेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रदेश संघटक एकनाथ पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिवसेनेला सोडचिट्ठी दिली आहे.
तसेच पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय देखील त्यांनी बोलवून दाखवला आहे. त्यासाठी पक्ष कोणता असेल ते लवकरच कळेल, असेही ते म्हणाले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत कामानिमित्त आलेल्या पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपच्या सत्तारूढ पक्षनेतेपदी राहिलेल्या आणि सत्ताधारी भाजपची साथ सोडून शिवसेनेत गेलेल्या पवारांना विधानसभेतील पराभव फारच जिव्हारी लागला आहे. तशी सल त्यांनी पत्रकारांसमोर बोलून दाखवली.
पवार म्हणाले, गेल्या दोन वर्षांपूर्वी उद्धव साहेबांच्या शिवसेनेमध्ये मी प्रवेश केला. उध्दवसाहेब, संजय राऊत, अनिल देसाई, सचिन अहिर यांच्याशिवाय उर्वरित नेत्यांच्या कार्यपध्दतीचा वाईट अनुभव आला. माझ्या मतदारसंघातील संपर्कप्रमुख विनायक थोरात, नेते विनायक राऊत, सुषमा अंधारे यांनी माझ्या प्रवेशाला आणि निवडणूकीसाठी बी फार्मला मातोश्रीवर खुप विरोध केला होता.
हे नेते दलाला सारखे दुसऱ्या उमेदवाराबरोबर डील करत होते. हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वेदनादायक होते. माझ्या मतदारसंघाच्या बाजूला दुसऱ्या एका उमेदवारासाठी उद्धव साहेबांची सभा होती. माझ्या जिल्ह्यामध्ये केवळ एकच जागा शिवसेना लढत असताना त्या ठिकाणी हे दलाल उद्धव साहेबांची सभा होऊ देत नाहीत, याचा अर्थच असा आहे की, उद्धव साहेबांना फसवण्याचा काम ही मंडळी करत आहेत. माझ्या स्टेजवर दुसरा उमेदवार ज्याला डुप्लिकेट बी फार्म दिला तो उमेदवार येऊन माझ्या पराभवाला कारण ठरतो.
त्यामुळे मी अशा कल्चरमध्ये कधीही टिकू शकणार नाही. मी अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारा संवेदनशील कार्यकर्ता आहे. यामुळे मी शिवसेनेचा स्वतः राजीनामा दिला आहे. माझा शिवसेनेबरोबरचा कालावधी तेवढ्या काळापुरताच होता. आजही शिवसेनेत देवासारखी माणसे आहेत. परंतु त्यांच्या आजूबाजूला दलालासारखे काम करून शिवसेना संपवणारे शिवसेनेचे वाटोळ करत आहेत. त्यामुळेच मी माझ पॉलिटिकल करिअर अशा माणसांसाठी खर्च करणार नाही.
उद्धव साहेबांची भेटीची वेळ मागितली. संजय राऊत यांच्याशी पंधरा दिवसांपूर्वी दीड तास चर्चा केली. एका व्यक्तीमुळे पक्षातील सामान्य कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांवर कारवाई करणे शक्य नाही. माझ्या आयुष्यातल्या शेवटच्या क्षणापर्यंत मी माझ्या जिल्ह्यासाठी, तालुक्यासाठी काम करणार.
पिंपरी-चिंचवड कर्मभूमीमध्ये माझं 35 वर्षांचा काम आहे. ते काम हे कोणीही हिरावु शकणार नाही. त्यामुळे मी याही आणि त्याही ठिकाणी काम करणार, एवढी माझ्यात ताकद आहे. आगामी महापालिका निवडणुक कोणत्या पक्षाकडून लढवायची याचा निर्णय मी नजिकच्या काळात घेईल, असेही ते म्हणाले आहेत.