बापाने केला दहा वर्षीय मुलाचा खून

0
4

दि. 19 (पीसीबी) दहा वर्षीय मुलाचा गळा आवळून बापाने खून केला. ही घटना शुक्रवारी १७ जानेवारी) रात्री सोनवणे वस्ती, चिखली येथे उघडकीस आली. धनराज वैभव हांडे (१०) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी वैभव मधुकर हांडे (५०) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शुक्रवारी रात्री धनराज हांडे हा त्याच्या घरात बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोस्ट मॉर्टम रिपोर्ट मध्ये धनराज याचा गळा आवळला गेल्याने मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार संशयावरून पोलिसांनी धनराज याचे वडील वैभव हांडे याला ताब्यात घेतले. त्याने हा खून केल्याचे कबूल केले आहे. मुलाचा खून करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. चिखली पोलीस तपास करीत आहेत.