महिला डॉक्‍टरची ६६ लाखांची फसवणूक

0
6

हिंजवडी, दि. 18 (पीसीबी)
जादा परताव्‍याचे आमिष दाखवून महिला डॉक्‍टरची ६६ लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना हिंजवडी येथे घडली.

याबाबत हिंजवडी वाकड रोड येथे राहणार्‍या ४३ वर्षीय महिला डॉक्‍टरने हिंजवडी पोलीसठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांीन निगडी येथे राहणार्‍या एका महिलेच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.ही घटना २८ जून २०२४ ते ३० ऑगस्‍ट २०२४ या कालावधीत हिंजवडी वाकड रोड, हिंजवडी येथे घडली. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार आरोपी महिलेने महिला डॉक्‍टर यांना गोल्‍ड कॉइनमध्‍ये गुंतवणूक केल्‍यास जादा परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. महिला डॉक्‍टरचा विश्‍वास संपादन करून त्‍यांना वेगवेगळ्या बँक खात्‍यातून ६६ लाख रुपये गुंतवणूक करण्‍यास भाग पाडले. मात्र गुंतवणूक केलेली रक्‍कम आणि कोणताही परतावा न देता ६६ लाख रुपयांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.