अनैतिक संबंधातून महिला वकिलाने आत्महत्या करायला भाग पाडले

0
6

पुणे, दि. 18 – पत्नीला सोडून माझ्याबरोबर रहा, तुझ्या मुलाचे माझ्या मुलीशी लग्न करुन दे आणि ३० लाख रुपयांची परतफेड कर अथवा सुस येथील फ्लॅट नावावर कर, या कारणावरुन अनैतिक संबंधातून एका महिला वकिलाने आपल्यासमोर लॉजमध्ये एकाला आत्महत्या करायला भाग पाडले.

अंकुश डांगे (वय ४५, रा. बालेवाडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अंकुश डांगे यांच्या पत्नीने बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी माढा तालुक्यातील ४२ वर्षाच्या महिला वकिलावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पुणे स्टेशनसमोरील होमलँड लॉजमध्ये ९ जानेवारी २०२५ रोजी घडली. अंकुश डांगे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली़. तेव्हा ही महिला वकिल तेथे उपस्थित होती. या महिला वकिलांचे पती न्यायाधीश असून त्यांना यांच्यातील अनैतिक प्रेमसंबंधांची कल्पना होती, असे पोलिसांनी सांगितले.