सैराट सारखा प्रकार, नातेवाईक मुलीवर प्रेम करतो म्हणून एकाला मारहाण

0
6

चिंचवड, दि. १७ (प्रतिनिधी)
नातेवाईक मुलीवर प्रेम करतो म्हणून एका १६ वर्षीय मुलाला दोघांनी बेदम मारहाण केली. ही घटना गुरूवारी (दि. १६) क्विंन स्टोन बिल्डींग समोरील मोकळ्या जागेत चिंचवड येथे घडली. याप्रकरणी विधीसंघर्षित बालकाने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गणेश कसबे व रोहित कसबे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नातेवाईक मुलीवर प्रेम करतो म्हणत संशयित आरोपींनी विधिसंघर्षित बालकाला लाकडी बांबू व बेल्टने मारहाण केली. तसेच शिवीगाळ केली.