मोशी परिसरातील मेडिकलमधून रोख रक्कम चोरीला

0
4

भोसरी, दि. १७ (प्रतिनिधी)
दुकानाचे शटर उचकटून चोरट्याने मेडिकलमधून रोख रक्कम चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. १५) रात्री बोऱ्हाडेवाडी येथे घडली. याप्रकरणी कमलेश सुनिल चौधरी (वय २१, रा. क्षितीज सोसायटी, आळंदी रोड, भोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असून गोविंदा देवप्पा कांबळे (वय १९, रा. महात्मा फुले नगर, एमआयडीसी भोसरी) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे सेक्टर नं. १४, बोऱ्हाडेवाडी येथे सनराईज केमिस्ट नावाचे मेडिकल दुकान आहे. बुधवारी रात्री दुकान बंद असताना चोरट्याने त्याचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातील काउंटरमधील १२ हजार ५०० रुपये रोख रक्कम चोरून नेली.