भोसरी, दि. १७ (प्रतिनिधी)
घरगुती वापराच्या सिलेंडरमधून गॅसची चोरी करून ती व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरणार्या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास आळंदी रोड, भोसरी येथे ही कारवाई करण्यात आली आहे. अजय धर्मराज सकुंडे, (२७) आणि अमोल हनुमंत जाधव (२८) बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस नाईक विजय दौंडकर यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सकुंडे आणि जाधव यांच्याकडे कसलाही परवाना नसताना ते घरगुती वापराच्या भरलेल्या गॅस सिलेंडर मधुन रिफीलच्या सहायाने घरगुती वापराचा गॅस अवैधरित्या घरगुती भरलेल्या सिलेंडर मधून व्यावसायिक सिलेंडर मध्ये गॅस काढून घेत असताना मिळून आले. आरोपींकडून ३५ घरगुती वापराचे, ३३ व्यावसायिक गॅस सिलेंडर, वजन काटा, गॅस रिफिल करण्याचे साहित्य व मोबाइल असा एकुण दोन लाख ४६ हजार ५३० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.