उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार सपत्नीक साईचरणी नतमस्तक…!

0
5

शिर्डी दि. 18 (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डीमध्ये दोन दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले त्याची आजपासून सुरुवात होणार आहे. या शिबिरासाठी उपमुख्यमंत्री श्री अजित दादा व खासदार सौ सुनेत्रा वहिनी पवार शिर्डी मध्ये आले असता त्यांनी सकाळीच साई बाबांच्या चरणी नतमस्तक होत मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद घेतला. यावेळी राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.