बीड,दि. 17 (पीसीबी) – बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. मस्साजोगचे (Massajog) सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सुरू असतानाच, जिल्ह्यात आणखी दोन सख्ख्या भावांची जमावाकडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनांमुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे गुरुवारी रात्री उशिरा जमावाने केलेल्या हल्ल्यात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. अजय भोसले आणि भरत भोसले अशी मृत भावंडांची नावे आहेत. या हल्ल्यात कृष्णा भोसले हा गंभीर जखमी झाला आहे.
गावात उभे असताना अजय, भरत आणि कृष्णा यांच्यावर गावातील आणि बाहेरील काही लोकांनी लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला. हा हल्ला कोणत्या कारणावरून झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अंभोरा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.