पुणे, दि. 17 (पीसीबी)
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे हे १५ आणि १६ डिसेंबर २०२४ रोजी दिंडोरी (नाशिक) येथील एका आश्रमात मुक्कामी होते, असा खळबळजनक आरोप केला आहे. या आश्रमाचे प्रमुख श्रीराम खंडेराव मोरे उर्फ अण्णासाहेब मोरे यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
आरोपींना आश्रय: वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे यांना १५ आणि १६ डिसेंबर रोजी दिंडोरी येथील आश्रमात आश्रय देण्यात आला होता.
सीसीटीव्ही फुटेजकडे दुर्लक्ष: सीआयडी पथकाने आश्रमाला भेट दिली, पण तेथील सीसीटीव्ही फुटेज का बघितले नाही, असा सवाल देसाई यांनी उपस्थित केला.
आश्रमाचे प्रमुख मोरे महाराज यांचा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी निकटचा संबंध असल्याचे देसाई यांनी म्हटले आहे.
आश्रमाचे प्रमुख श्रीराम खंडेराव मोरे उर्फ अण्णासाहेब मोरे आणि गृहमंत्री यांचे संबंध असल्यानेच सीआयडी ने तपासातील माहिती दडपली आहे, असा गंभीर आरोप देसाई यांनी केला आहे.
महिलांचे लैंगिक शोषणाचे प्रकरणात मध्यस्थ केल्याने त्या उपकारापोटी कराड याला आश्रय दिल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. अण्णासाहेब मोरे यांनी अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आणि त्याबाबत अनेक तक्रारी असल्याचा दावा देसाई करत आहेत.
२०२३ मधील तक्रारी मिटवण्यासाठी कराडची मध्यस्थी: २०२३ मध्ये या आश्रमाविरोधातील तक्रारी मिटवण्यासाठी वाल्मीक कराडने मध्यस्थी केल्याचा दावा.
अण्णासाहेब मोरेंना सहआरोपी करण्याची मागणी देसाई यांनी केली आहे. अण्णासाहेब मोरे यांना या प्रकरणात सहआरोपी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी. ऑडिओ, व्हिडिओ उघड करण्याचा इशारा देसाई यांनी दिला आहे. अण्णासाहेब मोरे हे महाराष्ट्रातील “आसाराम बापू” असून त्यांचे ऑडिओ, व्हिडिओ उघड करण्याचा इशारा दिला आहे.
धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेण्यामागे कराडला वाचवण्याचा प्रयत्न: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेत नाहीत, याचा अर्थ ते वाल्मीक कराडला वाचवत असल्याचा आरोप केला आहे.










































