प्राधिकऱणाचे माजी अध्यक्ष अगस्ती कानिटकर यांचे निधन

0
8

पुणे,दि. 17 (पीसीबी) – शिवसेनाप्रमुख बाळासाहाबे ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष अगस्ती कानिटकर (वय- ७७) यांचे बुधवारी (दि.१६) निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
राज्यात शिवसेना भाजप युतीचे राज्य असताना पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकऱणाचे अध्यक्ष म्हणून १९९७ ते २००० त्यांनी काम पाहिले. प्राधिकरणात मध्यमवर्गीयांसाठी सचिन, श्रीनाथ, पुर्णानगर आदी गृहनिर्माण संस्था तसेच व्यापारी संकूल आणि मातोश्री सॉफ्टवेअर पार्कची निर्मिती त्यांच्या काळात झाली. शिवसेना पिंपरी चिंचवड शहरात रुजविण्यासाठी त्यांचे मोठे योगदान होते. संघटनेतील होतकरू कार्यकर्त्यांना सर्व ताकद देऊन महापालिकेत ११ नगरसेवक त्यांनी निवडूण आणले होते.

एके काळी स्व. बाळासाहेब ठाकरे पुणे शहरात आल्यावर कानिटकर यांच्या महर्षिनगर येथील निवासस्थानी मुक्कामला असायचे. विश्वासू सहकारी म्हणून त्यांची प्राधिकरण अध्यक्षपदी नियुक्ती कऱण्यात आली होती.