दुचाकीच्या धडकेत पादचारी व्यक्तीचा मृत्यू

0
4

भोसरी, दि. 16 (पीसीबी)

दुचाकीच्या धडकेत पदाचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना 10 जानेवारी रोजी सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर भोसरी पोलीस ठाण्यासमोर घडली.

हिरासिंग प्रेमसिंग राठोड (वय 45, रा. विश्रांतवाडी पुणे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा विष्णू राठोड (वय 20) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकी (एम एच 14 /इ ए 4268) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील हिरासिंग राठोड हे पुणे नाशिक महामार्गावरून पायी चालत जात होते. भोसरी पोलीस ठाण्यासमोर आल्यानंतर त्यांना पाठीमागून भरधाव आलेल्या दुचाकीने धडक दिली. यामध्ये हिरासिंग यांचा मृत्यू झाला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.