कारच्या धडकेत महिला जखमी

0
4

काळेवाडी, दि. 16 (पीसीबी)

काळेवाडी येथे एका महिलेला कारने धडक दिली. यामध्ये महिला जखमी झाली. ही घटना 4 जानेवारी रोजी दुपारी घडली.

याप्रकरणी जखमी महिलेने काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कारचालक महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या पतीसोबत दुचाकीवरून काळेवाडी डी मार्ट जवळ गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी महिला तिची कार पार्किंग मधून मागे घेत होती. त्यावेळी कारची फिर्यादी महिलेला धडक बसली. त्यामध्ये फिर्यादी जखमी झाल्या. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.