बावधन, दि. 16 (पीसीबी)
कारच्या धडकेत पादचारी व्यक्ती जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. 14) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास बालेवाडी स्टेडियम जवळ घडली.
पोलीस अंमलदार इमरान शेख यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजेश पांडुरंग शिनगारे (वय 26) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस अंमलदार इमरान शेख हे पोलीस उप आयुक्त विवेक पाटील यांच्या सोबत पुणे मुंबई महामार्गावरून जात होते. त्यावेळी त्यांच्या समोर एका कारने पादचारी व्यक्तीला जोरात धडक दिली. यामध्ये व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीची ओळख पटली नाही. बावधन पोलीस तपास करीत आहेत.