गळफास घेऊन एकाची आत्महत्या

0
5

राहत्या घरात छताच्या लोखंडी अँगलला टॉवेलच्या साह्याने गळफास घेऊन एका व्यक्तीने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि. 15) सायंकाळी काडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आली.

सागर भवानी सेन (वय 46, रा. काडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे. मूळ रा. पश्चिम बंगाल) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर सेन हे मूळचे पश्चिम बंगाल येथील आहेत. ते मागील काही वर्षांपूर्वी तळेगाव दाभाडे येथे कामाच्या निमित्ताने आले होते. ते तळेगाव एमआयडीसी मधील एका कंपनीमध्ये कुक म्हणून काम करत होते. बुधवारी सायंकाळी ते छताच्या लोखंडी अँगलला टॉवेलच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.