वाल्मिक कराडचा वाकडला फोर बीएचके फ्लॅट, मिळकतकर थकबाकी जप्ती नोटीस मिळताच वसूल

0
4

पिंपरी,दि. 16 (पीसीबी) – चिंचवड मध्ये वाल्मिक कराडचे दोन फ्लॅट असल्याची बाब बुधवारी उघडकीस आली होती.यापैकी पार्क स्ट्रीट येथील सहाव्या मजल्यावर असलेल्या चार बी.एच.के फ्लॅट ची एक लाख ५५ हजाराची थकबाकी असल्याचे पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाने सांगितले होते. याबाबत फ्लॅटवर नोटीस लावण्यात आली होती. अखेर या फ्लॅटची थकबाकी ऑनलाइन स्वरूपात अदा करण्यात आली आहे. तर वाकड येथील फ्लॅटची २० हजार ६७१ पैकी ९ हजार ६८७ रुपयांचा पहिला हप्ता भरण्यात आला आहे. कराड कुटुंबीयांनी हे दोन्ही थकीत कर ऑनलाईन पद्धतीने अदा केले आहेत.

वाल्मिक कराड हा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील संशयित आरोपी आहे. त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी पिंपरी- चिंचवड मध्ये वाल्मिक कराडचे दोन फ्लॅट असल्याची बाब उघडकीस आली. काळेवाडी येथील पार्क स्ट्रीट सोसायटीत सहाव्या मजल्यावर वाल्मिक कराडच्या नावावर आलिशान चार बी.एच.के फ्लॅट असल्याचे उघड झालं. परंतु, दीड लाखांची थकबाकी असल्याची नोटीस पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाकडून लावण्यात आली होती. वाकड परिसरातील ‘मी कासा बेला’ या सोसायटीत टू बी.एच.के फ्लॅट वाल्मिक कराडची पत्नी मंजली वाल्मिक कराडच्या नावावर असल्याचं समोर आलं होतं. त्या फ्लॅटवर देखील चालू वर्षांचा थकीत कर बाकी होता. हे दोन्ही कर कराड कुटुंबीयांनी ऑनलाइन पद्धतीने भरले आहेत. पार्क स्ट्रीट येथील दीड लाखांचा थकीत कर भरल्याने जप्ती आणि लिलावाची प्रक्रिया टळली आहे.