लेबर कॅम्प मध्ये कामगारांमध्ये हाणामारी

0
5

महाळुंगे, दि. 15 (पीसीबी)
महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वासुली येथे एका लेबर कॅम्प मध्ये कामगारांमध्ये पाण्याच्या बादली वरून हाणामारी झाली. यामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत. ही घटना १२ जानेवारी रोजी सायंकाळी घडली.

विकास लक्ष्मी प्रसाद (वय २७, रा. वासुली, ता.खेड), ब्रिजेश श्रीपूर्णवासी चव्हाण (वय २०, रा. वासुली, ता. खेड) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी विकास यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कमलेश शेठ आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास यांचा मित्र ब्रिजेश हा लेबर कॅम्प मध्ये बादलीने पाणी भरत असताना आरोपींनी त्याच्याकडे बदली मागितली. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. ब्रिजेश याने विकास यांना याबाबत सांगितले. विकास हे जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपींनी विकास आणि ब्रिजेश यांना मारहाण करून गंभीर जखमी केले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.