जेवण केले का असे विचारल्याने मजुरावर वार

0
13

वाकड, दि. 14 (पीसीबी)

मजुरी कामासाठी ताथवडे बस स्टॉप येथे थांबलेल्या एका मजुराने त्याच्या ओळखीच्या तरुणाला जेवण केले का, असे विचारले. त्या कारणावरून तरुणाने मजुरावर धारदार हत्याराने वार करत जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. 13) दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली.

व्यंकट मुकुंदा चव्हाण (वय 36, रा. दत्त मंदिर रोड, वाकड) असे जखमी मजुराचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार यश शिंदे (वय 20, रा. थेरगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व्यंकट चव्हाण हे मजुरी काम करतात. ते कामासाठी ताथवडे बस स्टॉप येथे थांबले होते. त्यावेळी तिथे त्यांच्या तोंड ओळखीचा तरुण यश शिंदे आला. व्यंकट यांनी यश शिंदे याला तू जेवण केले का, असे विचारले. त्या कारणावरून यश शिंदे यांनी व्यंकट यांच्याशी वाद घातला. त्यानंतर धारदार वस्तूने व्यंकट यांच्या हातावर आणि पोटावर वार करत त्यांना जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.