दि. 12 (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नियोजित दौऱ्यात बदल करत काल शिर्डी येथील द्वारकामाई वृद्धाश्रमास भेट दिली. या वृद्धाश्रमात १४० पेक्षा अधिक वृद्धांचा सांभाळ होतो. मुख्यमंत्री महोदयांनी या आश्रमाला भेट द्यावी अशी इच्छा या वृद्धाश्रमाचे दिवंगत संचालक श्रीनिवासजी यांची होती. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या आश्रमाला भेट देत त्यांची ही इच्छा पूर्ण केली.
या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार वृद्ध माता-पित्यांच्या शुभहस्ते शुभाशीर्वाद देऊन करण्यात आला. आपल्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात आणि त्यांच्या आशीर्वादांमुळेच काम करण्याची शक्ती आणि स्फूर्ती मिळत असल्याची भावना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या मनोगतातूनच त्यांच्यातील संवेदनशीलता आणि सेवा भाव दिसून आला.
यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.