संभाजी ब्रिगेडचा दणका : तक्रारीनंतर लांडेवाडीतील जिजाऊ पुतळा परिसराची स्वच्छता

0
6

जिजाऊ जयंतीनिमित्त स्वच्छतेचा महापालिकेला विसर : सतीश काळे यांनी व्यक्त केला निषेध
भोसरी, दि. १२ –
नको त्या गोष्टी मध्ये प्रसिद्धी मिळविणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेला राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचा विसर पडला आहे लांडेवाडी भोसरी येथील जिजाऊंचा पुतळा परिसर शिवरायांचे म्युरल स्वच्छ करण्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले याचा संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी निषेध केला आयुक्त शेखर सिंह यांना फोन करून तक्रार केली त्यानंतर त्वरित महापालिका प्रशासन जागे होत जिजाऊ पुतळा परिसराची स्वच्छता करून घेतली सतीश काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकार नमूद केले आहे की महाराष्ट्र राज्यासह सर्वसामान्य बहुजनांचे प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवराय यांना घडविण्याचे काम जिजाऊंनी केले राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ या सर्व बहुजनांची प्रेरणास्थान आहे त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वच जाती धर्मातील नागरिक त्यांना अभिवादन करतात मात्र पिंपरी चिंचवड महापालिकेला त्याचा विसर पडला आहे एकही अधिकाऱ्यांकडून माता जिजाऊंना अभिवादन केले नाही एका बाजूला हे चित्र आहे तर दुसरीकडे भोसरी येथील लांडेवाडी मध्ये असणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या पुतळा परिसरात स्वच्छता देखील राखण्याचे कष्ट महापालिकेने घेतले नाही राजमाता जिजाऊ जयंतीदिवशीच जिजाऊ पुतळा परिसरात अस्वच्छता होती पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली नाही वाहने पार्किंग केल्याने पुतळा परिसराचे विद्रुपीकरण झाले होते तसेच या ठिकाणी असणाऱ्या म्युरल देखील धुळीने माखलेल्या होत्या त्याची स्वच्छता न केल्याने संभाजी ब्रिगेडने संताप व्यक्त केला शहराध्यक्ष सतीश काळे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना फोन करून त्वरित ही गोष्ट निदर्शनास आणून दिली आयुक्त सिंह यांनी दिलेल्या सूचनेनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी महापालिका कर्मचाऱ्यांनी पुतळा परिसर स्वच्छ करून घेतला मात्र महापालिकेच्या या उदासीन कारभाराने संभाजी ब्रिगेड कडून तीव्र निषेध नोंदविण्यात आला.