संपत्तीच्या वादातून वृद्ध व्यक्तीला मारहाण

0
5
fight

दिघी, दि. 12 (पीसीबी)
संपत्तीच्या वादातून १७ जणांनी मिळून एका वृद्ध व्यक्तीला मारहाण केली. ही घटना १८ ते २७ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत दिघी येथे घडली.

पांडुरंग पोपट लोखंडे (वय ६३, रा. दिघी) यांनी याप्रकरणी ११ जानेवारी रोजी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार महिला, हनुमान भिका लाडके, सचिन आढारी, अरुण जाधव, अमर अरुण जाधव, रामदास मारुती तिटकारे, विष्णू बुरसे, मारुती घिगे, रामदास नामदेव वाजे, रमेश शांताराम मते, जीवन भिका लाडके, शांताराम पांडुरंग रावते, शांताराम रावते यांचा मुलगा आणि प्रवीण राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पत्नीच्या अंत्यसंसकाराच्या वेळी त्यांच्या संपत्तीच्या वाटणीवरून आरोपींनी फिर्यादी यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. दमदाटी करत मारहाण करून जखमी केले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.