कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक

0
5

दोघांवर गुन्हा दाखल

चाकण, दि. १२
कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. ११) दुपारी चाकण येथे करण्यात आली.

हनुमंत शिवाजी गालबे (वय ३३, रा.अहिल्यानगर), विकास महिंद्रा उबाळे (वय २९, रा. अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रेमकुमार पावडे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्याकडील वाहनात सहा बैल करकचून बांधून ठेवले. जनावरांची चारा पाण्याची व्यवस्था न करता त्यांची कत्तलीसाठी वाहतूक केली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर चाकण पोलिसांनी कारवाई करत दोन वाहने जप्त केली. तसेच सहा बैलांची सुटका केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.