चिकन घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाला बेदम मारहाण

0
3
crime

चिखली, दि. १२
चिकन घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाला दुकानदार आणि त्याच्या साथीदारांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. १०) रात्री रुपीनगर येथे घडली.

सचिन महादू साळवे असे जखमी ग्राहकाचे नाव आहे. याप्रकरणी ऋषिकेश अरुण खाजेकर (वय २१, रा. तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शेशमहंमद हासिफ शेख (रा. तळवडे) आणि इतर तीन ते चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ऋषिकेश यांचे मामा सचिन साळवे हे शुक्रवारी रात्री आरोपी शेख याच्या चिकन सेंटर मध्ये चिकन घेण्यासाठी गेले. चिकन घेतल्यावर पैसे देऊन परत निघत असताना शेख याने सचिन यांना शिवीगाळ केली. त्याला व्यवस्थित बोल, असे सांगितले असता शेख याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून सचिन यांना बेदम मारहाण केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.