सहकार दरबारला मोठा प्रतिसाद

0
3

पिंपळे सौदागर, दि. ११ –
पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघ यांनी अमृतमहोत्सवी सहकार दरबारचे आयोजन केले होते.

शहरांचा झपाट्याने होणारा विकास आणि त्यामुळे नवीन सहकारी गृहनिर्माण संस्थांची संख्या वाढत आहे. अश्या सोसायट्यांमध्ये मध्यमवर्गीय व्यक्ती आपल्या आयुष्याची पुंजी लावून घर विकत घेतात परंतु घर घेतेवेळी विकासकांनी दिलेली विविध आश्वासने व गृहनिर्माण संस्था स्थापन झाल्यानंतर सुनियोजनाच्या अभावामुळे निर्माण होणार्या समस्या सोडवण्यासाठी सोसायटीला सिव्हील कोर्टात दावा करण्याशिवाय दुसरा मार्ग नसतो. ही प्रक्रिया खर्चिक आणि वेळखाऊ असल्याकारणाने त्याचा तक्रार करणाऱ्या व्यक्तीला त्रास होतो म्हणून सहकार दरबारच्या माध्यमातून अश्या समस्यांचे निरसन करून मार्गदर्शन केले जाते. या अमृतमहोत्सवी सहकार दरबारचे आयोजन हॉटेल शिवार गार्डन, पिंपळे सौदागर येथे करण्यात आलेले होते.

या मेळाव्यायासाठी शहरातील विविध भागातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघसचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, कोषाध्यक्ष चारुहास कुलकर्णी, पुणे जिल्हा उपनिबंधक संजय राऊत, पुणे शहर उपनिबंधक नागनाथ कंजेरी, ऑड. कणाद लहाने यांनी मार्गदर्शन केले. तर खासदार श्रीरंग बारणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे मा.विरोधीपक्ष नेते विठ्ठल उर्फ नानासाहेब काटे यांची प्रमुख उपस्थिती होती.