पुणे-बंगळुरू महामार्गावर वाकड ते देहूरोड दरम्यान विकसित होणार २४ मीटर रुंदीचे नवे सर्व्हिस रोड

0
4

पिंपरी, दि. ११
पुणे-बंगळुरू महामार्गावर वाकड ते देहूरोड दरम्यान २४ मीटर रुंदीचे नवे सर्व्हिस रस्ते विकसित केले जातील, असे आदेश काढण्यात आले आहेत.
दरम्यान,
आमदार शंकर जगताप यांनी मानले नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी निवडणुकीत दिलेल्या वचनांची अंमलबजावणी करत पुणे-बंगळुरू महामार्गावर वाकड ते देहूरोड दरम्यान २४ मीटर रुंदीचे नवीन सर्व्हिस रोड तयार करण्याच्या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला आहे. या यशस्वी निर्णयाबद्दल त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये –
सर्व्हिस रोड उभारणी: वाकड ते देहूरोड दरम्यान दोन्ही बाजूंना २४ मीटर रुंदीचे नवे सर्व्हिस रोड विकसित केले जातील.
अत्याधुनिक सुविधा: अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंट आणि वाहतूक व्यवस्थापन प्रणालीचा वापर करून या रस्त्यांवर अत्याधुनिक सोयी सुविधा उभारल्या जातील.
वाहतूक कोंडी कमी होणार: या रस्त्यांमुळे वाकड ते देहूरोड दरम्यान वाहतूक कोंडीपासून नागरिकांना मुक्तता मिळणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या आदेशानुसार, पुणे-सातारा विभागातील एनएच-४८ च्या ३०.२ किमी लांबीच्या सर्व्हिस रोडच्या उन्नतीकरण आणि पुनर्वसनासाठी रु. ६३०.३२ कोटींचा प्रकल्प राबवला जाणार आहे. या प्रकल्पासाठी हायब्रीड अन्युइटी मॉडेल (HAM) अंतर्गत बोली प्रक्रिया सुरू आहे.

महत्त्वाच्या तारखा
निविदा प्रक्रिया सुरूवात: 8 जानेवारी 2025
निविदा सादर करण्याची अंतिम तारीख: 24 फेब्रुवारी 2025
तांत्रिक निविदा उघडण्याची तारीख: 25 फेब्रुवारी 2025

या प्रकल्पामुळे वाहनचालकांची सोय होणार असून महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. हा प्रकल्प चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल, असे स्थानिक नागरिक आणि तज्ज्ञांचे मत आहे..

“निवडणुकीत दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. वाकड ते देहूरोड दरम्यान होणाऱ्या या प्रकल्पामुळे नागरिकांना होणाऱ्या अडचणी कमी होतील आणि परिसराच्या विकासाला चालना मिळेल. यासाठी नितीन गडकरी यांच्या सहकार्याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे.”
– शंकर जगताप, आमदार, चिंचवड विधानसभा मतदारसंघ.