दुचाकीच्या धडकेत एक जण गंभीर जखमी

0
5

दि. 10 (पीसीबी) – दुचाकी व मोपेड वाहनाच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. २ जानेवारीला रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास काळी भिंत रोड चऱ्होली येथे हा अपघात झाला. संतोष रघुनाथ ताटे (वय ४९, रा. चऱ्होली) असे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी त्यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकी चालक कन्हैया पिराजी बाबुळकर (वय २१, रा. चऱ्होली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या स्कूटरवर (एम एच १२, टीजी २१२०) जात होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या (एमएच २९ सीडी ७८०२) दुचाकीने त्यांना जोरात धडक दिली. यामध्ये संतोष ताटे यांच्या डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी झाले.