मेसमधून पैशांची बॅग चोरीला

0
4

पिंपरी, दि. १० –
खानावळीच्या काउ्न्टरवरून पैशांची बॅग चोरून नेली. ही घटना २६ नोव्हेंबर २०२४ रोजी घडली. याप्रकरणी गुरुवारी (दि. ९) लंका चंद्रकांत आखाडे (वय ४२) यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कृष्णा उडीया गौडा (वय २५, रा. रहाटणी फाटा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या काळेवाडीमध्ये अशोका सोसायटी रोड येथे श्रद्धा मेस चालवतात. त्यांच्या खानावळीच्या काउन्टरवरून रोख रक्कम असलेली बॅग चोरली. त्यामध्ये १५ हजार रुपये रोख होते.